आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी क्लिंटनअध्यक्षपदासाठी हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे मंगळवारी हार्ड चॉइसेस नावाचे चरित्र प्रकाशित होत आहे. या वेळी एबीसी न्यूज आणि अन्य अमेरिकी वृत्तसंस्था त्यांची मुलाखत घेतील.पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हिलरी 2016 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार म्हणून पुढे येण्याच्या प्रयत्नात असल्याचे मानले जाते. पुढील आठवड्यात न्यूयॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया आणि वॉशिंग्टन उपनगरात आयोजित पुस्तक मेळ्यात त्या भाग घेणार आहेत. हिलरी यांना डेमोक्रॅटिक पार्टीची उमेदवारी मिळाल्यास रिपब्लिकन पार्टी त्यांना तुल्यबळ लढत देईल, असे मानले जाते.