आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारांकित हॉटेलसारखे होते 80 वर्षांपूर्वी दुर्घटनेत नष्ट झालेले एअरशिप, वाचा EXCLUSIVE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरशिप अशा स्वरुपाचे एअरक्राफ्ट आहे जे सिगारच्या आकाराच्या गॅसच्या बॅगच्या आकाराचे असते. 6 मे 1937 मध्ये जर्मनीचे प्रसिद्ध प्रवासी एअरशिप हिंडेनबर्ग दुर्घटनेत नष्ट झाले. या दुर्घटनेसह एअरशिपचे युग संपुष्टात आले. जर्मनीचे एअरशिप अमेरिकेच्या न्युजर्सीजवळ असलेल्या लेकहर्स्ट नेव्हर एअर स्टेशनवर डॉक करणार तेव्हाच त्याला भीषण आग लागली. बघता बघता अवाढव्य एअरशिप हवेतच नष्ट झाले.
यावेळी एअरशिपमध्ये एकूण 97 लोक होते. त्यातील 35 या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. एकूण लोकांपैकी 36 प्रवासी तर 61 क्रू कर्मचारी होते. प्रवाशांपैकी 13 तर क्रू कर्मचाऱ्यांपैकी 22 जणांचा यात मृत्यू झाला. यात एअर स्टेशन परिसरातील एक क्रू कर्मचारीही मृत्युमुखी पडला. एअरशिपला आग लागली तेव्हा काही लोकांनी त्यातून उडी मारून जीव वाचविला. जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा एअरशिप 200 मीटर उंचीवर होते.
हिंडेनबर्ग दुर्घटनेमुळे याचे निर्माण करणारी कंपनी डॉयचे जेपलिनला मोठा धक्का बसला. या एअरशिपची सेवा त्याच वर्षी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत युरोप, ब्राझिल आणि अमेरिका येथे सेवा देण्याचे नियोजन होते.
एअरशिपमध्ये या सुविधा होत्या
या एअरशिपची लांबी 803.8 फूट तर वजन सुमारे 242 टन होते. याच्या मेटल फ्रेममध्ये हायड्रोजन गॅस भरला होता. यात अत्याधुनिक बेडरुम्ससह लायब्रेरी, डायनिंग रुम आणि शानदार लाऊंज होते. 80 मील प्रति तास या गतीने हे एअरशिप उडू शकत होते.
यामुळे झाला होता अपघात, वाचा पुढील स्लाईडवर