आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Households And Temple Attacked In Bangladesh

बांगलादेशात अल्पसंख्याकांची घरे, मंदिरांवर हल्ले, पैगंबरांच्या अवमानाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशात पूर्वेकडे असणा-या किमल्ला जिल्ह्याच्या होमना येथे सुमारे 3000 समाजकंटकांच्या जमावाने हिंदू अल्पसंख्याकांच्या घरांवर आणि धार्मिक स्थळांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी याठिकाणी 20 मिनिटे चांगलाच धुमाकूळ घातला, लुटालूटही केली. 26 एप्रिल रोजी ही घटना घडली होती, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हिंदु युवकांनी फेसबूकवर पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप हल्लेखोरांनी केला होता. या प्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आली असून, त्यात बागमारा येथील मदरश्याच्या प्रिंसीपलचाही समावेश आहे.

या घटनेतील मुख्य संशयीत नजरूल इस्लाम मात्र फरार आहे. जमात ए इस्लामी आणि काही समाजकंटकांनी सुनियोजीतपणे हा हल्ला केला असे सांगितले जात होते. या हल्ल्यात हल्लेखोरांनी अनेक घरांतील मौल्यवान वस्तुंची चोरीही केली. प्रारंभिक तपासात या प्रकरणात कोणीही जखमी नसल्याचे समोर आले आहे. होमना पोलिसांचे प्रमुख असलम शिकदर यांनी गावक-यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची छावणी तैनात केल्याची माहिती दिली.

पुढे वाचा : लाऊडस्पीकरवर घोषणा देऊन जमावास भडकवले