आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत हिंदू धर्माच्या ज्ञानकोशाची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबिया (अमेरिका) - जगातील सर्वात प्राचीन धर्मापैकी असलेल्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, इतिहास तसेच भारतीय भाषा, कला, संगीत इत्यादींविषयी इत्थंभूत माहिती देणारा ज्ञानकोश तयार झाला आहे. जीवनाचा मार्ग सांगणा-या धर्माला वाङ्मयीन पातळीवर व्यक्त करण्यासाठी 25 वर्षांची तपश्चर्या करावी लागली. त्यासाठी एक हजार विद्वानांनी प्रयत्न केले असून सोमवारी (26 ऑगस्ट) त्याचे दक्षिण कॅरिलोनामध्ये प्रकाशन होणार आहे.


हिंदू धर्माचे सविस्तर वर्णन करण्यासाठी अनेक खंडांची निर्मिती करावी लागली आहे. हे साहित्य इंग्लिशमधून तयार करण्यात आले आहे. हिंदू धर्माची शिकवण काय आहे, ती त्याचे पालन कशा प्रकारे केले जाते, हे स्पष्ट करण्यासाठी सात हजार लेख विविध खंडांतून वाचायला मिळणार आहेत. हिंदू धर्म म्हटल्यानंतर भारताचा उल्लेख नसेल तरच नवल. ज्ञानकोशात भारतीय इतिहास, भाषा, कला, शिल्पकला, औषधी, महिलांचे प्रश्न यांचाही ऊहापोह त्यातून शास्त्रीय अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे. आहेत. अमेरिकेतील या प्रकल्पात इंडिया हेरिटेज रिसर्च फाउंडेशनच्या सचिव साध्वी भगवती सरस्वती यांनी व्यवस्थापकीय संपादनाची जबाबदारी उचलली. दरम्यान, जगात लोकसंख्येच्या पातळीवर हिंदू समुदाय तिस-या स्थानावर आहे. ख्रिश्चनांची संख्या 2.2 अब्ज आहे. मुस्लिम 1.6 अब्ज एवढी आहे तर हिंदू सुमारे एक अब्ज आहेत.


कोणी केला भीमपराक्रम ?
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना विद्यापीठातील प्रोफेसर हाल डब्ल्यू. फ्रेंच (83) यांच्या नेतृत्वाखालील विद्वानांच्या चमूने ही वाङ्मयीन कामगिरी प्रत्यक्षात आणली. 1987 मध्ये त्यांनी हिंदू धर्माविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून फ्रेंच यांच्या टीमने अथकपणे पंचवीस वर्षे संकलन, संपादनाचे कार्य सुरूच ठेवले होते. यातून पूर्व आणि पश्चिमेला एकत्र आणण्याचे काम झाल्याचे मानले जाते. या कामात त्यांना इंडिया हेरिटेज रिसर्च फाउंडेशनचीदेखील मोलाची मदत झाली आहे.


काय आहे उद्देश ?
हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना एकूणच दक्षिण आशियाचा सखोल धांडोळा घेण्याचा आमचा प्रयत्न होता, असे प्रोफेसर हाल फ्रेंच यांनी स्पष्ट केले. फ्रेंच स्वत: आशियातील धर्म विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. आध्यात्मिक गुरू चंदानंद सरस्वती हे कॅरोलिना विद्यापीठाच्या एका परिषदेत सहभागी होणार आहेत.
11 खंड
1000 रेखाचित्र, छायाचित्रे.
3000 प्रतींची पहिली आवृत्ती.