आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाण निवडणुकीत हिंदू, शिखांसाठी राखीव जागा; करझाई यांनी वापरला विशेषाधिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - अफगाणिस्तानात होणा-या संसदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अल्पसंख्याक हिंदू आणि शीख नागरिकांसाठी राखीव जागा ठेवण्यास राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी बुधवारी कायदेशीर मान्यता दिली. अफगाण संसदेच्या कनिष्ठ सभागृहात हिंदू आणि शीख नागरिकांसाठी या जागा देण्यात येणार आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे बुधवारी हा निर्णय जाहीर केला. हिंदू आणि शिखांसाठी विशेष जागा देण्यासंदर्भातील विधेयक अफगाणिस्तानच्या संसदेत नाकारण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष करझाई यांनी विशेष अधिकाराचा वापर करून यासंदर्भात विशेष घटनात्मक आदेश जाहीर केला.