आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Temple Broken Into, Set On Fire In Pakistan

पाकिस्तानमध्ये विटंबनेनंतर हनुमान मंदिराची जाळपोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - कराचीमध्ये काही समाजकंटकांनी येथील एका हनुमान मंदिराची तोडफोड करून त्याला पेटवून दिले. कराचीतील लतिफाबादमधील या मंदिरात दोन आठवड्यानंतर वार्षिक जत्रा भरवण्यात येणार होती. शुक्रवारी पूजेच्या बहाण्याने तीन जण मंदिरात आले होते. परंतु आरतीनंतर एकाने हनुमानाच्या प्रतिमेची विटंबना केली आणि दुसर्‍याने केरोसीन टाकून आग लावली, अशी माहिती मंदिराची देखभाल करणार्‍या दर्शनने दिली.

मंदिराच्या परिसरात अनुसूचित जातीची सुमारे 600 कुटुंबे राहतात. विटंबनेच्या विरोधात शहरात शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या घटनेचा धार्मिकतेशी संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लारकानामध्ये 15 मार्च रोजी एका मंदिर आणि धर्मशाळेला आग लावण्यात आली होती. धार्मिक पुस्तकाला अपवित्र केल्याचा आरोपावरून हे कृत्य केले होते.