आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Temple Set Ablaze In Pakistan News In Marathi

पाकिस्तानात मंदिर, धर्मशाळा जाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - धार्मिक ग्रंथाच्या विटंबनेनंतर संतप्त नागरिकांनी सिंध प्रांताच्या लारकाना शहरातील हिंदू मंदिरावर हल्ला चढवला तसेच धर्मशाळेला आग लावली. या घटनेवरून निर्माण झालेल्या तणावामुळे प्रशासनाने संचारबंदी लागू केली.

धार्मिक ग्रंथातील काही पाने जाळल्याच्या आरोपावरून एका हिंदू नागरिकाच्या घराला चोहोबाजूंनी घेरले. निदर्शकांनी मंदिरावर हल्ला केला तसेच धर्मशाळेला आग लावली. निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांनी अर्शुधुराचे नळकांडे फोडले. लारकाना शहरातील जिना बाग आणि अन्य ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. ईशनिंदा करणार्‍या आरोपीला अमली पदार्थाचे व्यसन आहे. लारकानामधील हिंदू समाज कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा विचार करू शकत नाही, असे स्थानिक हिंदू पंचायतीच्या प्रमुख कल्पना देवी यांनी सांगितले.

विटंबना प्रकरणाची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर संतप्त विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. यानंतर त्यांनी जिना बाग परिसरातील हिंदू मंदिराला आग लावली. ही आग बाजूच्या धर्मशाळेपर्यंत पोहोचल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.