आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hindus Protest After Woman Converted To Islam In Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तानात हिंदू मुलीचे धर्मांतर करुन लावले मुस्लिम युवकाशी लग्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - दक्षिण सिंध प्रांतातील एका हिंदू महिलेचे धर्मांतर करुन मुस्लिम पुरुषासोबत लग्‍न लावण्‍यात आले. या घटनेवरुन या भागातील हिंदुंनी निदर्शन करुन निषेध केला. या घटनेमुळे हिंदू पंयाचतीच्‍या निवडणुकाही पुढे ढकलण्‍यात आल्‍या.

ही घटना जकोबाबाद येथे घडली. झांजरी स्ट्रीट भागात राहणारे सोन्याचे व्यापारी अशोक कुमार यांची मुलगी गंगा हिचा विवाह असिफ अली या मुस्लिम व्यक्तीबरोबर अमरोत शरीफ दर्ग्यामध्ये लावण्यात आला. विवाहापूर्वी तिने धर्मांतर करुन मुस्लिम धर्म स्विकारला. त्‍यानंतर तिने स्‍वतःचे नाव आसिया असे ठेवले.

या घटनेबद्दल तिच्या कुटुंबीयांना आणि नातेवाइकांना माहिती मिळताच त्यांनी आक्षेप नोंदविला. पण, तोपर्यंत त्यांच्या विवाहाची अधिकृत नोंद झाली होती. त्यामुळे त्यांनी जकोबाबाद येथे येऊन असिफ अली आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गंगाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी असिफ अलीच्या वडिलांना, भावाला अटक केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जकोबाबादमधील हिंदू संघटनांनी रस्त्यावर येत निदर्शने केली. तसेच त्यांनी सिंध प्रांतातील हिंदू नागरिकांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. या भागात हिंदू महिला तसेच मुलींचे अपहरण करुन त्‍यांना इस्‍लाम धर्म स्विकारण्‍यासाठी बळजबरी केली जाते, असा आक्षेप हिंदू समुदायातर्फे अनेक वर्षांपासून करण्‍यात येत आहे. हा प्रकार अलिकडच्‍या काही महिन्‍यांमध्‍ये वाढला आहे.