( छायाचित्र: हॅरी ट्रूमन )
फ्रँकलिन रूझवेल्टच्या नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हॅरी ट्रूम आले. दुस-या महायुध्दात जपानने अमेरिकेच्या पार्ल हार्बर बंदरावर हल्ला केला होता.त्यामुळे जपानला धडा शिकवावा याबाबत अमेरिकेत मोठे राजकीय खल झाले. 31 जुलै 1945 रोजी ट्रूमन यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा आदेश दिला होता. हवामान निर्भ्र असेल, तर हिरोशिमावर बॉम्ब टाकले जावे. लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात यावे. महिला आणि बालकांना यातून वगळले जावे, असे आदेशात म्हटले होते.
जपानच्या हिरोशिमा शहरातील पीस पार्कमध्ये एक दिवा सतत जळत आहे. जोपर्यंत जगात विध्वंसक अस्त्रे आहेत, तोपर्यंत तो जळत राहणार असा त्याचा अर्थ आहे. ठिक 69 वर्षांपूर्वी जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. तो दिवस होता 6 ऑगस्ट. यात पाऊणे दोन लाख नागरिक मारली गेली होती. तीन दिवसानंतर जपानच्या नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. ज्यात 80 हजार जणांचा बळी गेला. अणुबॉम्ब हल्ल्याचा परिणाम आजही येथील लोक भोगत आहेत.