आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Historical Places Of Kyoto City Of Japan, Narendra Modi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानच्या या शहराप्रमाणे पंतप्रधान मोदी करणार वाराणसीचा विकास, पाहा Special स्थळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: क्योटो शहरातील प्रसिध्‍द किंकाकू-‍जी मंदिर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्‍या जपानच्या दौ-यावर आहेत. क्योटोच्या धर्तीवर वाराणसीचा व‍िकास व्हावा यासाठी त्यांनी जपानशी करार केला आहे. क्योटो ही जपानची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे येताच मोदी यांनी तोजी बौध्‍द मंदिर आणि किंकाकू-जी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. क्योटोतील ऐतिहासिक इमारतींना युनिस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. जपानमधील या मंदिरांच्या शहरातील खास स्थळे divyamarathi.com येथे दाखवणार आहे.

किंकाकू-जी मंदिर, क्योटो
सोनेरी घुमट असलेले किंकाकू जी मंदिर क्योको-ची तलावाच्या समोर आहे. तलावाच्या पाण्‍यावर पडणा-या सावलीमुळे घुमट आणि मंदिराच्या सौंदर्यात फुलून दिसत असते. किंकाकू-जी हे बौध्‍द मंदिर आहे. या तीन मजली मंदिराला युनिस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे.
पुढे पाहा क्योटोमधील काही आणखी खास ठिकाणे...