आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिटलरचा पुतण्या अमेरिकी नौदलात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरचा पुतण्या दुस-या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेच्या नौदलात होता आणि काकाविरूद्ध लढण्यासाठी नौदलात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र त्याने अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांना लिहिले होते. त्यानंतर त्याला नौदलात सहभागी करून घेण्यात आले होते, असे आता स्पष्ट झाले आहे.
1939मध्ये युद्ध पेटल्यानंतर विल्यम पॅट्रीक हिटलर जर्मनी सोडून परागंदा झाला आणि न्यूयॉर्कमध्ये राहाणा-या नातेवाईकांकडे आला होता. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्याला अमेरिकेच्या सैन्यात सहभागी करून घेण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे त्याने अध्यक्ष रूझवेल्ट यांना मार्मिक पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्याने तो आपल्या काकाविरूद्ध का लढू इच्छितो, याचे विवेचन केले होते. विल्यमने या पत्रात लिहिले होते,‘मी कुख्यात चान्सलर आणि जर्मनीच्या नेत्याचा पुतण्या आणि त्यांचा एकमेव विरोधक आहे. त्यांच्या हुकुमशाहीने कळस गाठला आहे. जगभरातील स्वतंत्र ख्रिश्चनांना गुलाम बनवण्याची त्यांची इच्छा आहे.’ विल्यमचे हे पत्र एफबीआयचे तत्कालीन संचालक जे. इडगर हुवर यांच्याकडे पोहोचले. त्यांनीच
नाझीच्या विरोधात लढण्यासाठी विल्यमची निवड केली. विल्यम 1944मध्ये अमेरिकेच्या नौदलात सामील झाला. तीन वर्षांनंतर विल्यमने आपले नाव बदलून स्टुअर्ट हाऊस्टन असे ठेवले. तो हिटलरचा सावत्र भाऊ अ‍ॅलोइस आणि त्याची पत्नी ब्रिजेट डाऊलिंग यांचा मुलगा होता.