आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HIV Cured In Baby For First Time Claims Scientists

वैद्यकीय क्रांतीः मातेपासून बाळांना झालेली एचआयव्‍ही\' लागण नष्‍ट करण्‍यात यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- 'एचआयव्ही'वर उपचार शोधणा-या शास्‍त्रज्ञांना एक मोठे यश प्राप्‍त झाले आहे. या विषाणूची लागण झालेल्या एका लहान मुलीला बरे करण्यात अमेरिकेतील डॉक्‍टरांच्या एका पथकाला यश आले आहे. या मुलीला जन्‍मतःच तिच्‍या आईकडून 'एचआव्‍ही'ची लागण झाली होती. त्‍यामुळे या यशा‍मुळे वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांतीच होणार आहे.

मिसिसिपी राज्यातील डॉक्‍टरांच्‍या पथकाच्‍या प्रमुख डॉ. डेबोरा परसौद यांनी याबाबत माहिती दिली. त्‍यांनी सांगितले की, एका दोन वर्षांच्या मुलीला तिच्या आईकडूनच 'एचआयव्ही'ची लागण झाली होती. तिच्या आईला 'एचआयव्ही'ची लागण झाल्‍याचे निदान बाळंतपणातच झाले होते. त्‍यामुळे डॉक्‍टरांनी सुरवातीपासूनच त्यावर औषधोपचार सुरू केले. आईपासून मुलीला विषाणूची लागण डॉक्‍टरांना रोखता आली नाही. परंतु, मुलीवर करण्‍यात आलेल्‍या उपचारामध्‍ये निदानाची वेळ अतिशय महत्त्वाची ठरली. त्‍यामुळे विषाणुचा प्रसार होण्‍यापूर्वीच उपचार करुन विषाणूला शरिराबाहेर काढण्‍यात आले. एचआयव्‍हीचा शरिरात प्रसार होत असतानाच तो शरिरात लपण्‍याच्‍या जागा शोधतो. त्‍यापूर्वीच हे उपचार करण्‍यात आले. मुलीचा जन्‍म झाल्‍याच्‍या 30 तासांच्‍या आतच तिला 'झिडोवूडाईन', 'लॅमिवूडाईन', आणि 'नर्व्हिपाईन' या तीन औषधांचे विषाणू प्रतिबंधक औषधांचा डोस देण्‍यात आला. याचा‍ अतिशय प्रभावी परिणाम झाला. त्‍यानंतर नियमित उपचार सुरु झाले. जवळपास 10 महिन्‍यांपूर्वी तिच्‍या आईने उपचार थांबविण्‍याचा निर्णय घेतला. परंतु, चिमुकलीची पुन्‍हा वैद्यकीय चाचणी घेण्‍यात आली. त्‍यात तिच्‍या शरिरात एकही विषाणू आढळला नाही.

अशा स्वरूपाच्या उपचारांमुळे "एचआयव्ही' बाधित सर्वच रुग्णांना बरे करता येईल, असा आमचा दावा नाही. परंतु, मातेपासून बाळांना होणारा प्रसार रोखता येऊ शकतो, हे या उपचारातून स्‍पष्‍ट झाले आहे. यावर अधिक संशोधन करण्‍याची गरज आहे. त्‍या मुलीच्‍या शरिरात आता एचआयव्‍ही आढळला नाही. परंतु, आयुष्‍यभर ती एचआयव्‍हीमुक्त राहु शकेल की नाही, हे अद्याप ठामपणे सांगता येणार नाही, असेही या डॉक्‍टरांच्‍या पथकाने स्‍पष्‍ट केले. ती चिमुकली मात्र, आईला "एचआयव्ही'ची लागण झाली असताना मुलांना ती होऊ नये, यासाठी आता आपण सर्व उपचार करू शकतो,'' अशी प्रतिक्रिया डॉ. हॅना यांनी व्यक्त केली. जन्मानंतर आता दोन वर्षांनीही त्या मुलीमध्ये "एचआयव्ही'चे कुठलेही विषाणू नाहीत. अर्थात, या उपचारांमुळे ती मुलगी आयुष्यभर "एचआयव्ही'पासून मुक्त राहू शकेल की नाही, हे अद्याप सांगणे शक्‍य नाही.