आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Holi 2014: Holi Around The World,Holi Celebrations Around The World

जाणून घ्या, कोणत्या देशात केव्हा - कधी आणि कशी साजरी होते होळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगाऐवजी पाणी, माती-चिखल, फळे किंवा इतरही काही, मात्र उद्देश एकच मनात साचलेले 'गिले-शिकवे' दूर करुन एक दिवस अल्हड बालपणात परतायचं आणि आयुष्यात रंग भरायचे. आजच्या धावपळीच्या आणि ताण-तणावाच्या जीवनशैलीत अशा उत्सवांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
प्रत्येक सण-उत्सवात उत्साह भरलेला असतो. मात्र, कोणाची खिल्ली उडविण्याचे धाडस फक्त होळी-रंगपंचमी किंवा त्यासारख्या इतर सणांमध्येच आहे. त्याशिवाय इतर कशातच नाही. त्यामुळेच कदाचित या सारख्या उत्सवांना इतर देशांनीही आपल्या संस्कृतीत स्थान दिले आहे.
जगामध्ये होळी-रंगपंचमीसारखे इतरही अनेक उत्सव साजरे केले जातात. ज्यात एकमेकांना मस्ती, उत्साहाने भिजवले- रंगवले जाते, किंबहून काही ठिकाणी चिखलाने माखवले जाते. पुढील स्लाइडमध्ये जाणून घेऊ या कुठे, कसे साजरे होतात हे सण.