आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actor Paul Walker Dead In Road Accident

हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरचा अपघातात मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता 'फास्‍ट अँड फ्युरियस' चित्रपटांतील नायक पॉल वॉकर (वय 40)चा दक्षिण कॅलिफोर्नियातील सँटा क्‍लॅरिटा येथे कार अपघातात मृत्‍यू झाला. तो त्‍याच्‍या मित्राबरोबर एका चॅरिटी शो साठी जात होता. त्‍याचा मित्रही या अपघातात ठार झाला.

लॉस एजिंलस येथील एका अधिका-याने दिलेल्‍या माहितीनुसार, अपघात झाल्‍यानंतर कारने पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण गाडी भस्‍मसात झाली. पॉल वॉकरने अभिनय केलेला फास्‍ट अँड फ्युरिअसचा सहावा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्‍या सातव्‍या भागातही पॉल काम करीत होता. पॉलच्‍या अधिकृत फेसबुक पेजवर त्‍याच्‍या मृत्‍यूची माहिती देण्‍यात आली आहे.

येथे क्लिक करुन पाहा, किती भीषण होता अपघात