आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडचे अंतराळ विज्ञानात रंजक उड्डाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्यासाठी ब्रम्हांडाची काळजी करण्याचे काही कारण नाही. ते विशाल आहे, थंड आहे आणि आत्माहीन आहे. त्यात अशा शक्ती आहेत ज्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर निघताच तुमचे तुकडे तुकडे करू शकते. तरीही, ब्रम्हांड आणि अंतराळात कुतूहल आहे. त्याची कहाणी सांगणारे देखील आहेत. या बाबतीत हॉलीवूडपेक्षा प्रभावी लोक कुठेही नाहीत. आणि लवकर रिलीज होणार्‍या इंटरस्टेलर चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्यासारखा अजोड फिल्मकार या क्षणी कोणीही नाही.

इंटरस्टेलरची कथा साधी सरळ आहे. एका अज्ञात रोगाच्या प्रकोपाने पृथ्वीवरील जीवन नष्ट होत आहे. अंतराळवीर (मॅथ्यू मेकनॉघी, एन हाथवे) आणि वैज्ञानिक (जेसिका चेस्टेन, मायकेल केन) यांच्या एका पथकाकडे अशा दुनिया शोधण्याची जबाबदारी आहे जिथे पृथ्वीवरील लोक वसवले जाऊ शकतील. महत्त्वाकांक्षी चित्रपट भौतिकशास्त्र व ब्रम्हांडाशी निगडीत प्रश्नांची चाचपणी करते. लॉस एंजिलिसमध्ये टाइमला नोलनने सांगितले, विज्ञा कादंबरी चित्रपटात वास्तविकतांशी संबंधित बाधांपासून वाचू शकतात.

विज्ञान कथांवर आधारित चित्रपटांविषयी लोकांच्या आवडीच्या परिणामामुळे इंटरस्टेलर व स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर चितारलेला चित्रपट -द थिअरी ऑफ एवरीथिंग नोव्हेंबर महिन्यात एकाच आठवड्यात रिलीज होत आहे. हॉकिंगच्या जीवनाचे लक्ष्य ब्रम्हांडातील तारे, ग्रह आणि आकाशगंगांशी जोडणे आहे. नोलनही चित्रपटाद्वारे मानवी पद्धतीने असेच करू इच्छितात. फिल्म इंडस्ट्रीत नोलन यांची ओळख गरम व धमाकेदार कल्पनेचे थंड व्यक्ती आहेत. समीक्षक त्यांचा यशस्वी चित्रपट इन्सेप्शन व बॅटमॅन डार्कनाइट ट्रिलोजीलाही थंड मानतात.

इंटरस्टेलरला वैज्ञानिक रूपात खरे बनवण्यासाठी नोलन यांनी कॉलटेकचे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ किप थोर्ने यांची सेवा घेतली. चित्रपटात ब्रम्हांड विज्ञानाशी (कॉस्मोलॉजी) संबंधित तपशील थोर्नच्या पुस्तकांतून घेतला आहे. चित्रपटात अंतराळ इतिहासाच्या काही घटनांचा उल्लेख आहे. अत्यंत कुशलतेने चितारलेल्या एका दृश्यात अंतराळयानाच्या मिनिटाला ६७ फेर्‍या वेगाने दाखवल्या आहे. १९६६ मध्ये अमेरिकन विमानपत्तन व अंतराळ प्रशासनाच्या (नासा) जेमिनी - ८ यानाची गती ६७ आरपीएम होती. या दुर्घटनेत अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि डेव स्कॉट यांचा जीव थोडक्यात वाचला. नोलन सांगतात, जेमिनी घटना यात घेतली आहे.

इंटरस्टेलरमध्ये पृथ्वी उध्वस्त होण्याची घटना खरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या रोगामुळे पृथ्वीवर सर्व पीक नष्ट होते. जग धुळीचे पात्र बनते. नोलन यांनी इथे माहितीपटासारखे केले आहे. काही वयस्कर पृथ्वीवासी कॅमेर्‍याकडे पाहत जग नापीक होण्याची माहिती सांगतात. असे वाटते, ते खरे बोलत आहेत. वस्तुत:, ते अभिनेते नाहीत.

स्पेस ट्रॅव्हल आणि हॉलिवूडचा पडदा
चित्रपट युग आणि अंतराळ मोहिमांची सुरुवात विसाव्या शतकात झाली. त्यानंतर हे दोन्ही सोबत चालत आहेत. एक नजर टाकूया या दोन्ही रंजक आणि विचित्र पैलंूशी संबंिधत महत्त्वपूर्ण घटनांवर...

अभियानातील वास्तव
१६ मार्च १९२६ - रॉबर्ट गोडार्ड यांनी द्रवरूप इंधनावर चालणारे पहिले रॉकेट सोडले होते.
४ ऑक्टोबर १९५७ - सोविएत संघाने पहिला उपग्रह स्पुतनिक सोडला.
१२ एप्रिल १९६१ - यूरी गागारिन अंतराळात पोहोचणारे पहिले मानव ठरले.
२० फेब्रुवारी १९६२ - जॉन ग्लेन पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन.
१८ मार्च, १९६५ - अ‍ॅलेक्सी लियोनोव्ह अंतराळात चालणारे पहिले मानव.
२७ जानेवारी १९६७ - अपोलो - १ अंतराळ यानात आग लागल्याने तीन अंतराळवीर मारले गेले.

काल्पनिक विश्व
ली व्हॉयेज दाँ ला लुने (१९०२) - मेलीस बंधुंनी ही पहिली विज्ञान कादंबरी मूक फ्रेंच चित्रपट बनवला होता.
द डे द अर्थ स्टुड स्टिल (१९५१) - मानवाजवळ अणुबाँबने भयभीत झालेले एलियन्स पृथ्वीला इशारा देतात.
क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड (१९७७) - स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी चित्रपटात परग्रहाच्या लोकांची कथा सादर केली.
द राइट स्टफ (१९८३) - अंतराळात अमेरिकेतील पहिल्या मोहिमांची कहाणी.
अपोलो १३ (१९९५) - जवळपास शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात चित्रपट बनवला.
गेव्हिटी (२०१३) – चित्रपटात अंतराळ प्रवास आणि रोमांसचा रंजक मिलाफ आहे.