आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलियन्सचा हल्ला मोठय़ा पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी दोन महिन्यांत अंतराळातून येणार्‍या अनोळखी एलियन्सवर हॉलीवूडचे अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. 6 जूनला एज ऑफ टुमारो रिलीज होण्याबरोबरच बाहेरच्या जगातील पाहुणे येण्याची शृंखला सुरू झाली आहे. हे ऑगस्टपर्यंत चालेल. एजमध्ये पिर्‍हाना माशासारखे मुख असणारे जीव पृथ्वीवर हल्ला करतात. मानवजातीला हल्ल्यापासून वाचवण्याची जबाबदारी एमिली ब्लंट आणि टॉम क्रूझ वठवत आहेत. ते आणि त्यांचे साथीदार अंतराळातील विचित्र प्राण्यांशी लढण्यासाठी रोबोटिक सूट परिधान करतात.

एलियन्स अनेक स्वरूपांमध्ये येतील. कोणी मित्र असेल, तर कोणी कट्टर शत्रू. टेक सॅव्ही एलियन्ससुद्धा असतील. 13 जूनला द सिग्नलमध्ये हॅकिंगचा रोमांच असेल. 27 जूनला ट्रान्सफॉर्र्मस एज ऑफ एक्सटिंक्शनमध्ये रोबो एलियन्स पृथ्वीला रणभूमी बनवतील. 2 जुलैला चित्रपटगृहांमध्ये येणारा अर्थ टू इकोमध्ये एलियन्सशी दोन हात करण्यासोबत कौटुंबिक ड्रामादेखील जोडलेला आहे. ऑगस्टमध्ये गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी रिलीज होत आहे.