(छायाचित्र: गाडीचे मालक मायकल एसिनबर्ग बाईकवरून रपेट मारताना.)
वॉशिंग्टन - १९६९ च्या ‘इझी रायडर’ मध्ये अभिनेता पीटर फोंडा यांनी वापरलेल्या हर्ले डेव्हिडसनचा लिलाव करण्यात येणार आहे. त्या काळी या दुचाकीची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या चार गाड्यांपैकी ही एकुलती एक गाडी उरली आहे. कॅलिफोर्नियातील उद्योजक मायकल एसेनबर्ग यांनी या ऐतिहासिक गाडीचा लिलाव आयोजित केला आहे. एसेनबर्ग एकेकाळी फोंडा यांचे व्यावसायिक भागीदारही होते. १८ ऑक्टोबर रोजी हा लिलाव कॅलिफोर्नियातील कालाबासासमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
गाडीचे मालक मायकल एसिनबर्ग बाईकवरून रपेट मारताना.
१० ते २० लाख डॉलर्स रक्कम मिळणे अपेक्षित
पुढे वाचा मर्लिन मन्रोसोबत लाँग राइड