आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समर हॉलिडेत ब्रिटनमध्ये होळी पार्ट्यांची धूम !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ‘होळी रे होळी.. ’ च्या आरोळ्यांचा हा मोसम नसला तरी सध्या ब्रिटनमध्ये होळीच्या पार्ट्या तितक्याच उत्साहाने साजर्‍या केल्या जात आहेत. केवळ भारतीय समुदायातच नव्हे तर विविध समुदायातील लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात होळी संकल्पनेवर आधारित पार्ट्या मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

ब्रिटनमध्ये सध्या उन्हाळा चांगलाच तापू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय रंगपंचमीचा इंग्लिश अंदाज पाहायला मिळणार आहे. आगामी काही आठवड्यात लंडन, मँचेस्टर भागात होळी संकल्पनेवर आधारित पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात हजारो ब्रिटिश नागरिक सहभागी होणार आहेत. शनिवारी बट्टेरसी पॉवर स्टेशन या लंडनमधील भागात असाच होळीचा माहोल पाहायला मिळाला. होली वन फेस्टमध्ये जवळपास 15 हजार होळीप्रेमी नागरिकांनी रंगात न्हाऊन धमाल केली. पुढल्या शनिवारी पुन्हा याच ठिकाणी अशीच रंग उधळण पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मँचेस्टरमधील हिटन पार्कमध्ये होळीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्येही हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लंडनमध्ये ‘फन रन’ चे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात हंटिंग्डन कॅम्ब्रिजशायर भागात देखील करण्यात आले होते. लोकांनी हा उत्सव खूप एन्जॉय केल्याचे ‘द इंडिपेंडन्ट ’च्या वृत्तात म्हटले होते. हा सगळा मौजमजेचा भाग आहे. मैत्रीपूर्ण वातावरणात रंग खेळला जातो, असा अनुभव स्टीफन डाऊ यांनी सांगितला. डाऊ हे ‘होली वन’ चे पदाधिकारी आहेत.

नव्या ट्रेंडचे स्वागत
लोक एन्जॉय करण्यासाठी किंवा मजेसाठी काही वेळ काढत असतील तर ही गोष्ट चिंतेची नाही. हिंदू परंपरेला नेहमीच विश्व आनंदी व्हावे, असे वाटते. म्हणूनच नवीन ट्रेंडचे आम्ही स्वागत करतो.’’
- स्वामीनाथन वैद्यनाथन, सरचिटणीस,
हिंदू फोरम, ब्रिटन.