इंटरनॅशनल डेस्क - मुस्लिमांचा पवित्र महिना रमजान चालू आहे. हा महिना उपासनेसाठी ओळखला जातो. दुसरीकडे मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या शिनझियांग प्रांतात रमजान महिन्यात रोजे न धरण्यास चीनने केला मज्जाव. यासाठी शिनझियांग प्रांतातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना आदेश दिला आहे. जगभरात या पवित्र महिन्यात रोजे आणि अल्लाची उपासना सुरू झाली आहे.
रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो. या महिनेला उपासनेचा महिना म्हणून मानला जातो. लोक महिनाभर रोजे धरतात. यादरम्यान खाण्या-पिण्यावर बंदी असते. पवित्र महिन्यात अल्लाह आपल्या भक्तांवर कृपा करतो, असे मानले जाते. रमजानसाठी प्रत्येक मशिदींची साफ-सफाई आणि प्रकाशाची व्यवस्था करण्यात येते. बाजारपेठा विविध खाद्य आणि इतर वस्तूंनी सज्ज झाल्या आहेत. जगभरातील सर्व देशांमध्ये रमजानच्या महिन्यात एक वेगळीच बहर आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगभरामधील देशांतील रमजानचा बहर....