चार वर्षांची जुनी कंपनी नेस्टला कनेक्टेड गॅजेट्सच्या वापरातील वाढीचे श्रेय दिले जाऊ शकते. त्याचा 250 डॉलरचा थर्मोस्टेट वीज वाचवण्यासाठी आपल्या युजर्सच्या सवयी समजून जातो. उदाहरणार्थ, समजा घरात कोणी नसेल तर तापमान घटवतो किंवा विजेचे उजेड कमी करून देईल. त्याचे दुसरे उत्पादन नेस्ट प्रोटेक्ट जळणार्या वस्तू आणि संकटकाळी व्हॉइस अलार्म देतो. नेस्टची योजना सामान्य अमेरिकन घराला स्मार्ट बनवण्याची आहे. आता त्याचा एक मोठा पार्टनर
गुगल आहे.
नेस्टचे सीईओ टोनी फॅडेल यांना सिलिकॉन व्हॅलीत आयपॉडचे गॉडफादर मानले जाते. अॅपलमध्ये व्हाइस प्रेसिडेंट असताना त्यांनी म्युझिक प्लेअर आणि मोबाइल फोनला नवे रूप दिले होते. फॅडेल सांगतात, खरे म्हणजे स्मार्ट गॅजेट्समध्ये नेस्ट थर्मोस्टेटसारखी बुद्धी असायला हवी. त्यांना स्वयंचलित पद्धतीने तुमची इच्छा आणि गरजांच्या हिशेबाने जुळवून घ्यावे लागेल. त्यांचे म्हणणे आहे की, असे करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे तंत्रज्ञान आहे. ते सांगतात, जागरूक घर बनवण्यासाठी आम्ही प्रोसेस्ड डिझाइन करत आहोत. असे घर जे जाणू शकते की, तुमचे कुटुंब काय करत आहे. ते स्वत: तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्नही करेल.
या वातावरणात कोणत्याही बटणाची गरज पडणार नाही. स्मार्ट टेक्नॉलॉजीला तर तुमच्या इशार्यांची गरज नाही. घरांना नवे रूप देण्याच्या कंपनीच्या योजनेचा नेस्ट आणि नेस्ट प्रोटेक्ट पहिला टप्पा आहे. नेस्टच्या ओपन प्लॅटफॉर्मवर कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट मॅट रॉजर्स उत्साहित आहेत. याद्वारे डिव्हाइस एकमेकांशी बोलू शकतील. उदा. मर्सिडीझ बेन्झच्या काही कार नेस्टच्या थर्मोस्टेटशी संपर्क करू शकतील. त्यानंतर तुमच्या घरी परतण्याची वेळ लक्षात घेऊन तापमान अॅडजस्ट केले जाईल.