आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hong Kong Authorities Clear Part Of Admiralty Protest Site

हॉंगकॉंगमध्‍ये लोकशाहीसाठी आंदोलन करणा-यांना जागा खाली करण्‍याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉंगकॉंग - हॉंगकॉंगमध्‍ये लोकशाहीसाठी आंदोलन करणा-या आंदोलकर्त्यांना जागा खाली करण्‍याचे आदेश न्यायालयाने दिले. मुख्‍य आंदोलन स्थळी लोक बसून आहेत. पोलिसांनी बॅरिकेड्स काढून घेतले. आम्ही शांती आणि अहिंसाच्या मार्गावरच चालणार आहोत, असे विद्यार्थी संघटनेचा नेता जोसहुआ वोंग यांनी सांगितले.आमचा पोलिसांबरोबर कोणतेही वाद नाही. ब्रिटिशांचे राज्य हॉंगकॉंगवर होते.
एक देश दोन व्यवस्था या योजने अंतर्गत 1997 साली हॉंगकॉंगचा चीनमध्‍ये समावेश झाला. तसेच अधिक स्वायत्तता आणि स्वतंत्रता देण्‍यात आले. 2017 मध्‍ये हॉंगकॉंगच्या नव्या मुख्‍य अधिका-याची निवडणूक खुल्या पध्‍दतीने व्हावी अशी मागणी आंदोलकर्त्यांची आहे. मात्र चीनच्या म्हणण्‍यानुसार निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरलेल्या उमेदवारातून नव्या अधिका-याची निवड केली जाणार आहे.