आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hongkong Democracy Supporters Clashed With Police, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक-पोलिसांत चकमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - हाँगकाँगमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेले आंदोलन सोमवारी आणखी चिघळले. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. हाँगकाँगच्या मुख्य रस्त्यांवर ठिय्या दिलेल्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी ८७ वेळेस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रविवारी नऊ ठिकाणी अश्रुधुराचा मारा करण्यात आला.
बळाचा वापर केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता,असे सहायक आयुक्त चेंग ताक-केउंग यांनी सांगितले.अश्रुधुराची नळकांडी फोडल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. अश्रुधुराचा मारा करताना सुरक्षा जवानांनी स्वत: कवच घालण्याची कृती लाजिरवाणी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

लोकशाहीवर रचनात्मक चर्चा व्हावी
हाँगकाँगमधील सद्य:स्थितीबद्दल ब्रिटनने चिंता व्यक्त केली आहे. हाँगकाँगमध्ये लोकशाहीवर अर्थपूर्ण व रचनात्मक चर्चा होईल अशी आशा करतो, असे ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.