आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकशाहीसाठी विद्यार्थी हाँगकाँगच्या रस्त्यावर, चीनच्या धोरणांना विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - हाँगकाँगमध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी आठवडाभराच्या आंदोलनास सुरुवात केली. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी तासिकांवर बहिष्कार टाकत विद्यापीठ परिसरात ठिय्या दिला. विद्यार्थी निवडणूक सुधारणांबाबत चीनच्या धोरणाचा विरोध करत आहेत.

नेता निवडीच्या पद्धतीवर आक्षेप
हाँगकाँगच्या नेतृत्वासाठी होणा-या निवडणुकांसाठी खुल्या उमेदवारीची मागणी चीनने फेटाळली आहे. याचाच अर्थ निवडणुकीतील उमेदवार चिनी प्रशासनाकडून ठरवला जाईल. परिणामी हाँगकाँगमध्ये संपूर्ण लोकशाहीची मागणी करणा-या नागरिकांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

एक ऑक्टोबरला मोठे आंदोलन
तासिकांवर बहिष्कार टाकण्याच्या आंदोलनात दोन डझनहून जास्त शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. लोकशाही समर्थक गट ऑक्युपाय सेंट्रलने एक ऑक्टोबर रोजी मोठ्या निदर्शनांचे आयोजन केले आहे. सोमवारी सुरू झालेले आंदोलन त्याचाच एक भाग आहे.
२०१७ मध्ये मुख्य कार्यकारीची निवड
चीनने २०१७ मध्ये हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी नेत्याची निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते. मात्र या वर्षी ऑगस्टमध्ये चीनने मतदारांना दोन िकंवा तीन उमेदवारांमधून एकाची निवड करण्याचा पर्याय ठेवला होता. एका नामांकन समितीद्वारे या उमेदवारांची निवड केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.