आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hosni Mubarak's Disqualified From Next Month's Presidential Runoff.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुबारक यांचा आज फैसला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - सत्तेचाळीस वर्षे हुकूमशहा राहिलेले इजिप्तचे होस्नी मुबारक यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात शनिवारी सुनावणी होणार आहे. मुबारक व त्यांच्या मुलाचा काय फैसला होतो, याचे लाइव्ह प्रक्षेपण राष्ट्रीय टीव्हीवरून जग पाहणार आहे. जगातील सर्वात मोठय़ा खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागल्यामुळे इजिप्तच्या टीव्हीने परदेशी मीडियाला त्याच्या कव्हरेजसाठी आमंत्रण दिले आहे. त्यासाठी भली मोठी रक्कम मागण्यात आली आहे.

हबीब यांच्यासह माजी गृहमंत्री हबीब अल-अदली व इतर सहा सहकारी न्यायालयात हजर राहणार आहेत. होस्नी मुबारक यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आरोप असलेल्यांमध्ये उद्योगपती हुसेन सालेम यांचाही समावेश आहे. जानेवारीत इजिप्तमधील क्रांतीच्या काळात हत्याकांड, सरकारी निधीचा गैरवापर असे अनेक आरोप मुबारक यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर आहेत.

हुकूमशहा स्ट्रेचरवर : काळेभोर केस, चेहर्‍यावर तुकतुकीतपणा आणि वय ऐंशी असे एका ओळीत मुबारक यांचे वर्णन करता येईल. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना डॉक्टरांनी शारीरिक हालचाली करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सत्तेचाळीस वर्षे सत्ता गाजवणारा हा हुकूमशहा स्ट्रेचर पडूनच सुनावणीला हजर राहणार आहे. मुबारक यांनी आतापर्यंत आपल्यावरील कोणत्याही आरोपाची कबुली दिलेली नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.