आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hosni Mubarak's Disqualified From Next Month's Presidential Runoff.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मठेप इजिप्तला ‘मुबारक’!, ‘ब्रदरहूड’चा शिक्षेस विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - 30 वर्ष इजिप्तवर एकहाती सत्ता गाजवणारे पदच्युत राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली तरीही त्यांच्या चेह-यावर कु ठलेही खेदजनक भाव उमटले नव्हते. विशेष म्हणजे खटल्याच्या संपूर्ण कालावधित मुबारक यांनी एकदाही आपल्या गुन्ह्यांबद्दल खेद,खंत अथवा कबुली दिली नाही.
गडद काळा गॉगल घातलेल्या मुबारक यांना लष्करी रुग्णालयाच्या स्ट्रेचरवरच न्यायालयात आणण्यात आले. पिंज-यामागे स्ट्रेचवर पडलेल्या अवस्थेतच त्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्या वेळी दगडासारखे निश्चिल, निर्जीव भाव त्यांच्या चेह-यावर होते.
निकाल ऐकण्यासाठी कोर्टरूम व न्यायालयाच्या परिसरात नागरिक आणि मुबारक समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. न्यायमूर्ती अहमद रफात यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वी न्यायालयात टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता पसरली होती. न्यायमूर्ती म्हणाले, 30 वर्षांच्या काळ्याकुट्ट अंधारनंतर मंगळवार, 25 जानेवारी 2011 रोजी इजिप्तची जनता एका नव्या आशेसह जागी झाली होती. तो दिवस ऐतिहासिक होता. मुबारक यांच्या हुकूमशाहीविरोधात गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीच्या कालावधित देशात उठाव झाला होता.18 दिवस चाललेल्या या क्रांतीच्या वेळी मुबारक सरकारच्या दडपशाहीत 800 क्रांतिकारी शहीद झाले. या शहीद क्रांतिकारकांंना आज न्याय मिळाला.
रफात यांनी शिक्षा सुनावताच एकच जल्लोष झाला. ‘अल्ला हो अकबर’ अशी उत्स्फूर्त घोषणाबाजी,फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. या वेळी अनेक जणांनी मुबारकला फासावर चढवा अशीही मागणी केली. गप्पा पुरे झाल्या मुबारक यांना फाशी द्या अशा घोषणाही न्यायालयाबाहेर सुरू होत्या. मुबारक यांना शिक्षा झाली तरीही त्यांच्या कारकिर्दीत जनतेवर अत्याचार करणारे पोलिस मात्र मोकळेच राहिले त्याबद्दलही अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दहा महिने हा खटला चालला. या खटल्याच्या सुनावणीसाठी इजिप्तच्या गृहमंत्रालयाने मजबूत सुरक्षा व्यवस्था उभी केली होती. न्यू कैरोच्या पोलिस अकादमीत हा खटला चालला. अकादमीभोवती असलेल्या भिंतीची उंची चार मीटरने वाढवण्यात आली. व त्यावर पुन्हा एक मीटर उंचीचे तारेचे कुंपण घालण्यात आले होते. शिक्षा सुनावल्यानंतर मुबारक यांना लष्करी रुग्णालयातून हेलिकॉप्टरने कैरो शहराबाहेरील तुरुंगात
हलवण्यात आले. त्यांचे सहआरोपीही त्याच ठिकाणी 25 वर्ष कारावास भोगणार आहेत.
‘ब्रदरहूड’चा शिक्षेस विरोध
इजिप्तमधील सर्वांत प्रभावी राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणा-या मुस्लिम ब्रदरहूडने या निकालास विरोध केला. नव्याने खटला चालवण्याची मागणी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मोहम्मद मुरसी यांनी केली. 16-17 जूनला येथे मतदान होत आहे. निकालानंतर मुबारक यांना हेलिकॉप्टरने टोरा तुरुंगात नेण्यात आले. 1981 मध्ये मुबारक इजिप्तचे राष्ट्रपती झाले. अरब राष्ट्रांतील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या या राष्ट्रावर त्यांनी 30 वर्षे राज्य केले. त्यांनी आपल्या शासनकाळात देशात कायम आणीबाणी लागू केली होती. 25 जानेवारी 2011 नंतर मुबारक यांच्याविरुद्ध जनता हळूहळू रस्त्यावर उतरली. प्रसिद्ध तहरीर चौकात 18 दिवस निदर्शकांनी आंदोलन केले. या काळात सुरक्षा दलाच्या कारवाईत 850 लोक मारले गेले तर 6 हजार जखमी झाले होते. शेवटी 11 फेब्रुवारी 2001 रोजी मुबारक यांनी राष्ट्रपतीपद सोडले.
मीडियालाही दूरच ठेवले
खटल्याच्या कामकाज सुरू असताना देशीविदेशी पत्रकार, दूरचित्रवाहिन्यांना दूरच ठेवण्यात आले. खटल्याच्या कामकाजाचे प्रक्षेपण व चित्रण
करण्याची परवानगी केवळ
इजिप्तच्या सरकारी वाहिनीस देण्यात आली होती.
इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना जन्मठेप, कैरोत आनंदोत्सव
मुबारक यांच्यावर कारवाईला सुरुवात