आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंट कॅफे : भारतासह जगभरात 650 अब्जांचा कारभार, रॉजर फेजरर ब्रँड अॅम्बेसिडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील लिंट चॉकलेट कॅफेमध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी एका भारतीयासह जवळपास 40 लोकांना ओलीस ठेवले आहे. सिडनीतील मार्टिन प्लेस येथे 2000 मध्ये हा कॅफे सुरु झाला. स्वित्झर्लंडच्या या कंपनीचे शंभराहून अधिक देशांमध्ये कॅफे आहेत. 650 अब्जांचा त्यांचा उद्योग आहे. जगभरात त्यांचे नऊ हजार कर्मचारी आहेत. टेनिस स्टार रॉजर फेडरर त्यांचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लिंटचे आठ कॅफे आहेत, तर भारतात मुंबईतील वरळी येथेही लिंट कॅफे आहे.
ऑस्ट्रेलियात लिंट कॅफे सुरु करण्यासाठी व्हिक्टोरिया या कंपनीने त्यांची फ्रेचायझी आठ मिलिअन ऑस्ट्रेलियन डॉलर अर्थात 41.60 कोटी रुपयात खरेदी केली आहे. या कॅफेला फार मोठा इतिहास आहे. 170 वर्षे जुनी ही कंपनी आहे. 1845 मध्ये ज्यूरिख येथे डेव्हिड स्प्रुंगली स्क्वार्ज यांनी लिंट ही कंपनी सुरु केली. 1986 मध्ये चॉकलेट तयार करणार्‍या या कंपनीने अमेरिकेत त्यांचा पहिला आयपीओ आणला होता.
मार्टिन प्लेस सिडनीतील सर्वात मोठे बिझनेस हब
मार्टिन प्लेस सिडनीतील सर्वात मोठे बिझनेस हब आहे. येथून अमेरिकन दुतावास फक्त एक किलोमीटरवर आहे. रेल्वे स्टेशन देखील जवळच आहे. सिडनी ओपेरा हाऊस दीड किलोमीटरवर आहे. टाऊन हॉल देखील काही अंतरावरच आहे. अवघ्या नऊ दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला असल्याने मार्टिन प्लेस येथे गर्दी जास्त होती. त्यामुळे देखील दहशतवाद्यांनी लिंट कॅफेला निशाणा बनवले असण्याची शक्यता आहे.
फोटो - लिंट कॅफेमध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या महिलांच्या हातात झेंडा देऊन तो खिडकीतून दाखवण्यात आला.

पुढील स्लाइडमध्ये वाच, खिडकीतून झळकलेला झेंडा कुणाचा