आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Cities Will Look In Five Centuries If Sea Level Rises Predicted By Scientists

PHOTOS : पाचशे वर्षानंतर सगळीकडे असेल पाणीच पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीर्षक वाचून दुष्काळी भागातील नागरिक सुखावले असतील, कारण महाराष्ट्राच्या काही भागात हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. मात्र, हे वृत्त दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे नसून जगाची चिंता वाढवणारे आहे.

तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाचशे वर्षानंतर हे विश्व कसे दिसेल. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, पुढील पाचशे वर्षानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी एवढी वाढलेली असेल की, अनेक जगप्रसिध्द इमारती या पाण्यात बुडालेल्या दिसतील. 'दिव्य मराठी डॉट कॉम'ने अशी छायाचित्रे तुमच्यासाठी आणली आहेत, ज्याद्वारे स्पष्ट होईल की, भविष्यात या इमारतींचे चित्र कसे असेल.

सेंट पीटर्सबर्ग येथील संशोधक आणि कलाकार निकोलाय लॅम यांनी ही चित्रे तयार केली आहेत. या चित्रांतून अमेरिकेच्या प्रसिद्ध इमारती भयावह दिसत आहे. ग्लोबल वार्मींगमुळे आगामी 500 वर्षांत समुद्राच्या पाण्याची पातळी 20 ते 30 फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. विशेषम्हणजे, गेल्या प्रत्येक शंभर वर्षांत 6.6 च्या सरासरीने पाण्याची पातळी वाढत आहे.