आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचएसबीसी बँकेकडून मुस्लिमांची खाती बंद, पत्र पाठवून निर्णय कळवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मुस्लिम समुदाय आणि संबंधित सर्व ग्राहकांची खाती बंद करण्याचा निर्णय एचएसबीसीकडून घेण्यात आला आहे. अनेक खाती ‘जोखमी’ची असल्याचा दावा करून बँकेने हा वादग्रस्त निर्णय घेतला आहे.

एसएसबीसीने लंडनमधील फिन्सबरी पार्क येथील सर्वात मोठ्या मशिदीला तसेच व्यक्ती, काही मुस्लिम संघटनांनादेखील पत्र पाठवून आपला निर्णय कळवला आहे. अशी पत्रे मुस्लिम समुदायाच्या विचारवंतांनाही पाठवण्यात आली आहेत. हा निर्णय कोणताही धर्म किंवा वर्णभेदातून करण्यात आलेला नाही. बँकेच्या जोखीम क्षमतेच्या पलीकडे असणारी सर्व खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात भेदभावाचा संबंध येत नसल्याचे बँकेने आपली भूमिका मांडताना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बँकेने 40 देशांची राजदूत कार्यालये, उच्चायुक्तांनादेखील विशिष्ट खाती बंद करण्यात यावीत, अशी मागणी करणारी पत्रे पाठवण्यात आली होती. दरम्यान, 2005 पर्यंत मशिदीचे प्रमुख पद अबू हमजा याच्याकडे होते; परंतु त्याला नंतर दहशतवादी कारवाया प्रकरणात अटक करण्यात आली होती.