आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huge Blast Observed On Sun And Earth May Be Effected

भीषण स्‍फोटाने सूर्य हादरला, पृथ्‍वीवर आज जाणवणार परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुरूवारी दुपारी सुमारे साडे बारा वाजता सूर्यावर भीषण स्फोट झाला. शनिवारी पृथ्वीवर त्याचा परिणाम जाणवू लागेल. उपग्रह ठप्प होण्याची शक्यता असून दळणवळण व्यवस्थाही विस्कळित होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

इस्त्रो हीभारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेबरोबरच जगभरातील शास्त्रज्ञ सूर्यावर होत असलेल्या स्फोटांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. सूर्यावर दोन रिबनच्या आकृतीचा स्फोट सुमारे अडीच ते तीन तास होत राहिला. इस्त्रोच्या अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेने 10 हजार सेकंदांपर्यंत सूर्यावर सुरू असलेल्या घडामोडींचे निरीक्षण केले आणि त्याची जवळपास 11 हजार छायाचित्रेही टिपली आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावर झालेल्या स्फोटांमुळे 10 कोटी इलेक्ट्रॉनिक व्होल्ट ऊर्जा बाहेर पडली. ही ऊर्जा 100 मेगाटन हायड्रोजन बॉम्ब एकाच वेळी फुटल्यानंतर बाहेर पडणार्‍या ऊर्जेइतकी होती, असे सूर्य आणि पृथ्वीच्या संबंधाबाबत संशोधन करत असलेल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पथकातील शास्त्रज्ञ राजमल जैन यांनी सांगितले.

1859 नोंदवला होता पहिला स्फोट: सूर्यावर होणार्‍या अशा स्फोटाची पहिल्यांदा नोंद 1 सप्टेंबर 1859 रोजी रिचर्ड सी. केरिंग्टन आणि रिचर्ड होडसन यांनी घेतली होती. त्यावेळी पांढर्‍या प्रकाशाचा स्फोट झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत सूर्यावर 160 वेळा स्फोट झाले आहेत.