आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज कडाडली अन् आग भडकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सर्वाधिक तेल साठे असलेल्या व्हेनेझुएलातील प्योर्टो ला क्रुझ येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रविवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. व्हेनेझुएलात सध्या चक्रीवादळ सुरू आहे. वीज कडाडल्यामुळे साठवण टँकला आग लागली आणि आकाशात उंच उंच आगीचे लोट उसळल्यामुळे परिसर रिकामा करावा लागला.

आग सोमवारी नियंत्रणात आल्याचा आणि तेल उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा व्हेनेझुएला सरकारने केला असला तरी माध्यमामध्ये आग अजूनही धुमसत असल्याची छायाचित्र झळकत आहेत.