आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Barbie Claims Interracial Couples Are Behind A Rise In Plastic Surgery

पृथ्वीवर अवतरली जिवंत बार्बी डॉल; शुक्र ग्रहावरून आल्याचा करतेय दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूक्रेन- 'बार्बी डॉल'सारखं दिसावं, असं जगातील प्रत्येक महिलेचे स्वप्न असतं. पृथ्वीवर अशीच एक जिवंत बार्बी डॉल अवतरली आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र, हे खरं आहे. युक्रेनमधील 28 वर्षीय तरुणी हुबेहूब एका बार्बी डॉल साेरखी दिसते. व्हेलेरिया ल्यूकानोवा असे तिचे नाव असून ती एक कॉस्मेटीक मॉडेल आहे. ती एक जिवंत बार्बी डॉल असल्याचे सांगते. विशेष म्हणजे तिने शुक्र ग्रहावरून आल्याचा दावा केला आहे.

व्हेलेरिया ल्यूकानोवा ही हुबेहूब एखाद्या बाहूलीसारखी दिसते. तिचा तेजस्वी चेहरा, निळे डोळे, गुलाबी ओठ आणि सोनेरी केसांमुळे ती स्वर्गातील अप्सरा असल्याचा पाहाणार्‍याला भास होतो. त्यामुळे व्हेलेरिया ही महिला आहे की बाहूली? असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील पहिल्या जिवंत बार्बी डॉलबाबत....