आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारे काही सांगणार ही डीएनए टेस्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षात ऑक्टोबर महिन्यात वेलेस्ली, मॅसाच्युसेट्सच्या क्रिस्टेन व्हिटेकरने आपल्या थुंकीचे सॅम्पल जेनेटिक्स कंपनी ‘23 अ‍ॅँड मी’ला पाठवले. कंपनीच्या लॅबने त्यांच्या जिनोम (जेनेटिक कोड)च्या जवळपास 10 लाख बिंदूंची तपासणी केल्यावर त्यांना पोटाचा विकार ‘सेलिएक’ असल्याचे निदान केले. एंडोस्कोपी केल्यावर याची खात्री झाली. यापूर्वी इतर आजारांवर उपचार घेत त्या कंटाळल्या होत्या. तरी त्यांच्या आजाराचे योग्य निदान होत नव्हते. यानंतर त्यांनी त्यांच्या तीनही मुलांची तपासणी करून घेतली. पाच वर्षांच्या त्यांच्या मुलाला ग्लूटन (गहू आणि अन्य धान्यात असणारे प्रोटिन) त्याला चालत नसल्याचे यानंतर स्पष्ट झाले. आता त्यांचे कुटुंब ग्लूटोनमुक्त आहे.
जर ‘23 अ‍ॅँड मी’ला सरकारने अंतिम मंजुरी दिली तर आजारांवर उपचाराची दिशाच बदलून जाईल. या तपासणीसाठी 16,500 रुपयांचा खर्च येतो. डीएनए टेस्ट एखाद्या सामान्य चाचण्यांप्रमाणे केली जाते. कॅलिफोर्नियाच्या या कंपनीची स्थापना गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिनची पत्नी एन वोजसिस्कीने केली आहे. डीएनए टेस्ट स्वस्त आणि सोप्या पद्धतीने झाल्याने याचे अनेक फायदे होतील. परंतु, अनेक तज्ज्ञांच्या मते अधिक प्रमाणावर माहिती मिळाल्याने याचे काही तोटेही आहेत. उदाहरणादाखल जर तुम्हाला अल्झायमर्सचा आजार होणार असल्याचे माहीत पडल्यास आणि त्याच्यावर कोणतेही उपचार शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यास तुम्हाला काय वाटेल? परंतु, ‘23 अ‍ॅँड मी’च्या कॉर्पोरेट डेव्हलपमेंट विभागाच्या उपाध्यक्षा एशेल गूल्ड म्हणतात, वैद्यकीय ज्ञानात दिवसागणिक भर पडते आहे आणि कदाचित याचमुळे डॉक्टर सामान्य जेनेटिक टेस्टिंगचा सल्ला देत नसावेत. दुसरीकडे व्हिटेकरचे डॉक्टर सामान्य डीएनए टेस्टला आधुनिक मेडिकल केअरचाच भाग मानतात.
जगभरातील अनेक देशांमध्ये ‘23 अ‍ॅँड मी’ टेस्टिंगचा वापर करणारे दीड लाखांवर लोकही त्यांच्याशी सहमत आहेत. आगामी काळात अशा लोकांची संख्या निश्चितच वाढेल.