आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इबोला संसर्ग प्रतिबंधक लसीची यशस्वी चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेनेगल - इबोला संसर्गावर प्रभावी ठरणाऱ्या लसीची माकडांवर यशस्वी चाचणी करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जीमॅप हे या औषधाचे नाव असून त्याचा प्रयोगकि स्वरूपात वापर करण्यात येत आहे. इबोलाशी निर्मुलनासाठी या संशोधनाने महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचे संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. ‘नेचर’ या अनियतकालकिात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संसर्ग झाल्यानंतर ३-४ दविसांनी या औषधाचा वापर केल्यावरही ते प्रभावी सदि्ध झाले आहे. सद्य:स्थतिीत जीमॅपचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाणार नाही. माणसांवर याचा काय परणिाम होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इबोला संसर्ग झालेल्या रुग्णांवर जीमॅपचा प्रयोग केल्यानंतरही ७ पैकी २ रुग्ण दगावले आहेत. जीमॅपचा वापर प्रयोगकि स्वरूपात करण्यात येत असल्याने त्याला ‘सीक्रेट सिरम’ संबोधण्यात येत आहे.
सेनेगलमध्येही इबोलाचा प्रादुर्भाव
सेनेगलमध्येही एक इबोलाग्रस्त रुग्ण आढळल्याचे अधकिृत सूत्रांनी सांगितले आहे. पश्चिम आफ्रिकेतील इबोला संक्रमण झालेला सेनेगल पाचवा देश ठरला आहे. पश्चमि आफ्रिकेत इबोलाग्रस्तांची संख्या २० हजारांपर्यंत गेली असल्याचे प्राथमकि अनुमान आहे. यामुळे अद्याप १५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.