आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांवर हल्ल्याची अफवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - व्हाइट हाऊसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले असून, या हल्ल्यात अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा जखमी झाले आहेत, अशी बातमी एपी वृत्तसंस्थेच्या सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या अकाउंटवरून मंगळवारी रात्री आली. दोन मिनिटांतच स्फोटाची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एपीचे अकाउंट हॅक झाले असून, ओबामा सुरक्षित आहेत, असे निवेदनात म्हटले होते. परंतु तोवर ओबामांवरील हल्ल्याच्या अफवेमुळे अमेरिकी शेअर बाजार 150 अंकांनी कोसळला. नंतर सिरियातील एक गट ‘सीरियन इलेक्ट्रॉनिक आर्मी’ने हॅकिंगची जबाबदार स्वीकारली.