लंडन - ब्रिटन व युरोपदरम्यान सागरी भुयारी रेल्वे सेवा रविवारी पुन्हा सुरू झाली. गेल्या शनिवारी आगीमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे युरोस्टार रेल्वेसेवेच्या २६ अतिजलद रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. सुमारे १२ हजार प्रवाशांना यामुळे हाल सोसावे लागले. रविवारी दुपारनंतर या भुयारातून एक विनाप्रवासी रेल्वे सोडण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष रेल्वेसेवा सुरू झाली.
या भुयारातून रेल्वेच्या बरोबरीने बांधलेल्या मार्गाने कार व ट्रकही जातात. नव्याने सेवा सुरू झाल्यानंतर ज्या प्रवाशांनी यापूर्वी तिकीट आरक्षित केले आहे.
रेल्वे लॉरीतील साहित्याला आग
शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास फ्रान्सकडे जाणा-या उत्तर बोगद्याजवळ अचानक सायरन वाजला. ब्रिटनहून फ्रान्सकडे जाणा-या रेल्वेतील एका लॉरीत असलेल्या साहित्याला अचानक आग लागली होती. यामुळे भुयारात धूर झाला. सर्व प्रवाशांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.