आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundreds Killed, Thousands Missing In Afghan Landslide

PHOTOS & VIDEO: अफगाणिस्तानमध्ये भूस्खलनात तब्बल 2100 मृत्युमुखी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल- अफगाणिस्तानच्या पुर्वेकडील बदकशान प्रांतात काल (शुक्रवार) झालेल्या भूस्खलनात तब्बल 2100 नागरिक मृत्युमुखी पडले असून 4,000 निर्वासित झाले. मुसळधार पावसामुळे बदकशान येथील पर्वताचा काही भाग घसरल्याने एक संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचे काम थांबविण्यात आले असून आता निर्वासितांना निवारा देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
सुरवातील पर्वताचा काही भाग घसरला. त्यानंतर घाबरून बदकशान येथील नागरिकांनी गावाबाहेर पळ काढला. काही कालावधीनंतर घसरण थांबली. त्यामुळे महत्त्वाचे सामान आणि पाळीव जनावरांची सुटका करण्यासाठी गावातील नागरिक पुन्हा गावात परतले. यावेळी पुन्हा पर्वताचा मोठा भाग गावावर घसरला. यामुळे 2100 नागरिक मृत्युमुखी पडले असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 4000 नागरिक निर्वासित झाले आहेत. यात महिला आणि बालकांची संख्या जास्त आहे.

बदकशान प्रांताचे गर्व्हनर शाह वल्लीउल्लाह अदिब यांनी सांगितले, की होबो बारिक गावात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावाजवळच्या पर्वताचा मोठा भाग गावावर घसरला. या गावातील सुमारे 300 घरे चिखलाखाली आले असून परिस्थिती गंभीर झाली आहे.
या परिसरात अजूनही जोरदार पाऊस होत असल्याने बचाव दलाला तेथे जाण्यास कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. भूस्खलनामुळे जवळपास संपूर्ण गावा ढिगाऱ्यात रुपांतरीत झाले आहे. या दुर्घटनेवर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमिद करझाई यांनी दुःख व्यक्त केले आहे.
काल शुक्रवार असल्याने गावातील नागरिकांचा विश्रांतीचा दिवस होता. बहुतांश नागरिक घरीच होते. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
पुढील स्लाईडवर बघा जिवाचा थरकाप उडविणारी छायाचित्रे....