आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundreds Of Drunk Rioters And Police Clash In Bellingham

मद्यपी युवक-युवतींनी असा केला हंगामा, की पोलिसही झाले हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलिंगम (अमेरिका)- अमेरिकेत युवक-युवतींना असलेले मद्याचे व्यसन, हुल्लडबाजी आणि नाईट पार्ट्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशीच एक पार्टी काही दिवसांपूर्वी बेलिंगम शहरात मध्यरात्री सुरू झाली. परंतु, दुसऱ्या दिवशी तिचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलखोरांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तरीही मद्य प्राशन केलेले युवक-युवती गोंधळ घालीत राहिले. काही वेळाने त्यांनी एका इमारतीत आश्रय घेतला. तेथून युवक-युवतींना काढणे पोलिसांसाठी बरेच जिकरीचे झाले.

या युवक-युवतींनी नाईट पार्टीत जबरदस्त मद्य घेतले होते. त्यानंतर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या तरुणाईने पोलिसांवरच बॉटल आणि दगड फेकण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी उपद्रवी तरुणाईवर मिर्ची पावडर बॉम्ब फेकले. या तरुणाईला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना कित्येक तास खर्ची करावे लागले.


PHOTO : (सौजन्य- बेलिंगम हेरॉल्ड)

तरुण-तरुणींना पोलिसांनी कसे केले नियंत्रित बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा