आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Brutally Murder Model Wife Yulia Loshagina In Russia

रशियातील एड्‍सगस्त मॉडेलची पतीकडूनच हत्या; भारतात झाले होते विवाहबद्ध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियातील यूरल माऊंटेनमधील जंगलात पो‍लिसांना एका महिलेचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला होता. डीएनए चाचणी हा मृतदेह 28 वर्षीय मॉडेल यूलिया लोशा‍गिन हिचा असल्याचे उघडकीस आले होते. यूलियाचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. विशेष म्हणजे यूलियाला एड्‍स झाला असल्याचे तिच्या शवविच्छेदन अहवालात उघड झाले होते. यूलियाला एड्‍स असल्यामुळे तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले.

मॉडेल यूलियाचा पती फोटोग्राफर दामित्री लोशागिन याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पत्नीच्या निर्घूण हत्येप्रकरणी त्याची कसून चौकशीनंतर पत्नीची हत्या केल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला.

चौकशी अधिकार्‍यांनी सांगितले, की यूलिया एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. यूलियाच्या एसआयव्हीची लागण तिच्या पतीलाही झाली होती. त्यामुळे त्याचा राग आल्याने दामित्री याने यूलियाची निर्घुण हत्या केली होती.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, यूलिया आणि दामित्रीचे भारतात झाले होते लग्न!