आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाटमाट मिळेना म्हणून पतीला जिवंत जाळले; भारतीय महिलेचे कृत्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन- थाटामाटात राहता येत नाही. त्यामुळे झालेल्या अपेक्षाभंगातून एका महिलेने पतीला जिवंत पेटवून दिल्याची घटना अमेरिकेत सोमवारी उजेडात आली. मसाजचा बहाणा करून पतीला जवळ बोलावले आणि त्याच्यावर केरोसिन ओतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सदर महिलेला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

अमेरिकेच्या टेक्सासमधील 27 वर्षीय श्रेया पटेल नावाच्या महिलेने हे अघोरी कृत्य केले. न्यायालयाने तिला दोषी ठरवले आहे. ही घटना पाच महिन्यांपूर्वीची आहे. त्यात श्रेया यांचे 29 वर्षीय पती विमल यांचा मृत्यू झाला. त्या अगोदर त्यांच्यावर पाच महिने उपचार सुरू होता; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. दुसरीकडे मात्र विमलने स्वत:ला आग लावली आणि मदतीसाठी तिला बोलावले, असे श्रेयाचे म्हणणे होते. श्रेया अतिशय थाटामाटात राहत होत्या. दोघांचा विवाह भारतात पारंपरिक पद्धतीने झाला होता; परंतु विमल यांच्याशी विवाह झाल्यानंतर श्रेयाचे स्वप्न भंगले. श्रेयाला वाटत होते तेवढे विमल श्रीमंत नव्हते, असे वकिलांनी सांगितले.