आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Nizam\'s Pink Diamond Sells For Record $39 Million

न्‍यूयॉर्कमध्ये 2.1 अब्ज रुपयांत विकला गेला हैदराबादच्या निझामाचा \'प्रिन्सी\'!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- हैदराबादच्या निझामाचा हीरा ‘प्रिन्सी’ची तीन कोटी 90 लाख डॉलरमध्ये (2.1 अब्ज रुपये) विक्री करण्यात आली. 'प्रिन्सी' गुलाबी रंगाचा असून दक्षिण भारतातील गोलकुंडामधील एका खाणीत सापडला होता. कोणे एके काळी हा हीरा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान यांच्याकडे होता.

हैदराबादच्या निझामाचा 34.65 कॅरेटचा ‘प्रिन्सी डायमंड’ हा गुलाबी हिरा 4 कोटी डॉलरला (सुमारे 212 कोटी रुपये) विकला गेला आहे. जगातील हा तिसरा सर्वात मोठा गुलाबी हिरा आहे. 300 वर्षांपूर्वी तो गोलकुंडा येथील खाणीत सापडला होता. किमतीच्या बाबतीत या हिर्‍याने डिसेंबर 2008 मध्ये 131 कोटींहून अधिक किमतीत विकल्या गेलेल्या 'विटल्सबॅश' हिर्‍याचा विक्रम मोडीत काढला आहे.

'प्रिन्सी डायमंड'चा संबंध हैदराबादच्या निझामाखेरीज बडोद्याच्या राजघराण्याशीही होता. बडोद्याचे राजकुमार प्रिन्स यांच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते. या हिर्‍याचा पहिला लिलाव 1960 मध्ये 38 लाखांत झाला होता. जगातील चार सर्वात मोठे गुलाबी हिरे गोवळकोंडा येथेच मिळालेले आहेत. इसवी सनपूर्व 800 पासून येथे हिर्‍यांचे खनन केले जात आहे.

सर्वात महागडा हिरा? माहित करून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...