आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये कारसाठी पॉप्युलर होतेय हायड्रोलिक कारडोक लिस्ट पार्किंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील बहुतेक मोठ्या शहरात कार पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लंडनमधील परिस्थिती काही वेगळी नाही. वाहनधारकांना पार्किंगसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे: मात्र, आता विदेशात हायड्रोलिक कारडोक लिस्ट असलेली अॅडव्हान्स पार्किंग सुरु करण्‍यात आल्या आहेत. हायड्रोलिक कारडोक लिस्ट पार्किंगमध्ये कमी जागेत एकाखाली एक अशा पद्धतीने कार पार्किंग करता येते.

लंडनमध्ये अनेक शहरात ही आधुनिक पार्किंग पद्धत आत्मसात केली आहे. घर अथवा दुकानांसमोर काही वर्गफूट जागेत हायड्रोलिक कारडोक पार्किंग उभारू शकतात. सिंगल मॉडेल पार्किंगसाठी 38 लाख रुपये तर डबल मॉडेलसाठी 45 लाख रुपये मोजावे लागतात. डबर मॉडेलमध्ये कमी जागेत दोन कार पार्किंग करू शकतात.