आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी 5700 किमी वेगाने उडणारे हायपरसोनिक विमान चाचणी अयशस्वी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- ताशी 5795 कि.मी. वेगाच्या हायपरसोनिक जेट व्हेवरायडर विमानाची चाचणी पुन्हा अयशस्वी ठरल्याची माहिती अमेरिकी हवाई दलाने दिली. या मानवरहित विमानाचा वेग ध्वनीच्या सहापट आहे.
चाचणीदरम्यान नियंत्रण पंख्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे विमान निर्धारित लक्ष्य गाठू शकले नाही आणि शेवटी अपघातग्रस्त होऊन ते समुद्रात कोसळले. अमेरिकी हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही सेकंदांत विमानात बिघाड झाला आणि ते दुर्घटनाग्रस्त झाले. प्रशांत महासागरातील बी- 52 बॉमर ठिकाणावरून त्याचे उड्डाण करण्यात आले होते. तांत्रिक चाचणी अयशस्वी ठरण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याआधी जून 2011 मध्ये व्हेवरायडरच्या पहिल्या चाचणीत अपेक्षित वेग प्राप्त झाला नव्हता. हायपरसोनिक विमान निर्मिती करण्याचा भाग म्हणून व्हेवरायडर प्रकल्प हाती घेतला आहे. या संशोधनाद्वारे प्रवासी विमानाची निर्मिती केली जाऊ शकते. सध्याच्या जेट विमानांच्या तुलनेत ही विमाने अधिक वेगवान असतील.