आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरिया युद्ध : 'मी खुदाला सर्व सांगेन', असे म्हणत 3 वर्षाच्या चिमुकल्याने सोडले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमिश्क - 'मी मेल्यानंतर खुदाला सर्वकाही सांगेन', हे शब्द आहेत, त्या तीन वर्षीय चिमुकल्या बालकाचे ज्याचा सिरियामध्ये झालेल्या एका स्फोटामध्ये मृत्यू झाला. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या या चिमुकल्याचा एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी हेच त्याचे अखेरचे शब्द होते.
रुग्णालयात वेदना सहत होत नसल्याने तो सारखा रडत होता. अखेरीस त्याला मृत्यूसमोर हार मानावी लागली व त्याने प्राण सोडले. पण त्याआधी या बालकाच्या तोंडून हे हृदयद्रावक वाक्य बाहेर पडले अन् त्याठिकाणी उपस्थित असणा-या डॉक्टरांसह सगळेच जणू सुन्न झाले होते. या प्रकारानंतर या मुलाचे फोटो आणि त्याच्या तोंडून निघालेले हे वाक्य सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. स्वतःला मानव समजणा-यांमधील मानवता संपली आहे की काय? असा सवाल सोशल मिडियावर प्रतिक्रियांमधून विचारला जात आहे.
सिरियामध्ये मार्च 2011 पासून नागरी युद्ध पेटलेले आहे. अधिकृत आकडा सांगयचा झाल्यास या युद्धात आतापर्यंत 150,000 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापैकी 11,420 बालके आहेत. वरील छायाचित्रातील बालकाचा फोटो पाहिल्यास आपल्याला याठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. या चिमुकल्याच्या मनातून निघालेल्या भावना आणि त्याच्या चेह-यावरचे भाव यामुळे तुमचे मन भरून येणार यात शंका नाही.