लॉस एंजेल्स- कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारण्याची संधी मिळाली होती, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी केला होता. 10 सप्टेंबर 2001 मध्ये क्लिंटन ऑस्ट्रेलियात' बिझनेस लिडर्सना संबोधित होते. या कार्यक्रमाचा टेप समोर आला आहे. त्यात क्लिंटन यांनी ओसामाच्या मारण्याबाबत आपले मत व्यक्त केले होते.
ओसामा बिन लादेन खूप धोरणी आहे. त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अनेकदा विचार केला होता. मलाच त्याला यमसदनी पाठवयाचे होते. पण त्यासाठी अफगाणिस्तानमधील कंदाहार शहराला उद्ध्वस्त करावे लागले असते आणि त्यात निष्पाप लोकांचा बळी गेला असता. मी जर असे केले असते, तर माझ्यात आणि लादेनमध्ये फरक काय असता, असे क्लिंटन टेप रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे. बिल क्लिंटन यांचे रेकॉर्डिंग टेप नुकतेच व्हिक्टोरियाच्या लिबरल पार्टीचे अध्यक्ष मायकल क्रोगरने ऑस्ट्रेलियातील स्काय न्यूजला दिले. टेप मी लपवून ठेवले नव्हते . पण त्याबाबत विसरलो होतो. बिल क्लिंटन यांचे रेकॉर्डिंग त्यांच्या संमतीने करण्यात आले होते, असे क्रोगर यांनी सांगितले.