आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत विद्यार्थिनीच्या पँटच्या खिशात आयफोनचा स्फोट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेत एका शाळकरी विद्यार्थिनीच्या खिशात आयफोनचा स्फोट झाला. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. शाळेत वर्ग सुरु असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने तिच्या पँटच्या मागच्या खिशात आयफोन ठेवला होता. वर्गात अचानक काही जळत असल्याची दुर्गंधी पसरली आणि काही कळण्याच्या आतच मोठा आवाज झाला. आयफोनचा स्फोट असल्याचे समजले. या स्फोटात विद्यार्थिनीचा पाय भाजला गेला आहे. यानंतर अन्य विद्यार्थ्यींनी तातडीने संबंधित मुलीची पँट बाजूला करून तिला रुग्णालयात हलवले.
मुलीने मागच्या खिशात आयफोन ठेवला होता. त्यावर दाब पडला असावा, तसेच मुलगी खाली वाकली असेल तेव्हा त्याचा स्फोट झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.