आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला अंतराळवीर व्हायचेय, पण मी सात वर्षांचा आहे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मोठेपणी काय व्हायचे हे लहान मुलांच्या तोंडून आपण नेहमीच ऐकतो, परंतु एका सात वर्षीय ब्रिटिश मुलाने आपली इच्छा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’कडे व्यक्त केली. त्याने पत्राद्वारे नासाला अंतराळवीर होण्यासाठी सल्ला देण्याचा हट्ट धरला आहे.


डेक्स्टर असे या मुलाचे नाव आहे. तो म्हणतो- डिअर नासा, मंगळावर तुम्ही दोन माणसे मंगळावर पाठवत असल्याचे मी ऐकले आहे. मलाही तिकडे यायला आवडेल, परंतु मी सात वर्षांचा आहे.


हस्तलिखित पत्रातून डेक्स्टरने अंतराळवीर होण्यासाठी काय करावे लागेल याचा सल्ला देण्याची विनंतीही केली आहे. त्यावर नासानेही बालहट्टाला योग्य प्रकारे साद दिली. अंतराळविषयक शिबिरांत सहभागी होत जा. शिबिरांतून चांगले गुण मिळव. आकाशाला गवसणी घालून ता-यांपर्यंत पोहोचण्याची जिद्द ठेव, असा सल्ला नासाने दिला आहे.


पत्र मोठमोठ्याने वाचले
डेक्स्टरला नासाकडून प्रतिसादाचे पत्र मिळाले. तेव्हा तो चकितच झाला. त्याने उत्साहाने पत्र उघडून मोठमोठ्याने वाचून दाखवले. त्यात काही फोटो, स्टीकर्स, पोस्टरदेखील असल्याचे पाहून तो आणखीनच आनंदी झाला. त्याला विज्ञान, गणित या विषयांत खूप रुची आहे. गेल्या वर्षी त्याने केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली होती, असा अनुभव डेक्स्टरची आई कॅटरिना अँडर्सन यांनी सांगितले.