आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Want To Become Prime Minister Of Pakistan: Malala Yousafzai

मला पाकिस्तानचे पंतप्रधान व्हायचेय - मलाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिली असली तरी देशाचे पंतप्रधान होण्याची आपली इच्छा आहे, असे पाकिस्तानची शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिने म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना मलाला आपला आदर्श मानते.
सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलालाने लहान मुले विशेषत: मुलींच्या शिक्षणाच्या आपल्या स्वप्नाचा उल्लेख केला. शिक्षणाच्या मुद्द्यावरून मलालास जगभरातील नेत्यांमध्ये स्थान मिळाले आहे. भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. राजकारण संपूर्ण देशाची सेवा करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यासाठी अगोदर मला डॉक्टर व्हायचे होते; परंतु आता मात्र मला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मला वाटेल तेवढा पैसा मी लहान मुलांच्या शिक्षणावर खर्च करू शकेल. परराष्ट्र संबंधांवरही माझे लक्ष असेल. तालिबानी माझ्या शरीराला गोळी मारू शकतील, माझ्या स्वप्नाला नाही. तालिबानने मला मारण्याचा प्रयत्न करून फार मोठी चूक केली आहे. नोबेल पुरस्काराबद्दल ती म्हणाली, नोबेलबद्दल मी शाळेच्या
अभ्यासात वाचले होते. अजून माझ्यामध्ये तेवढी पात्रता आलेली नाही. त्यासाठी खूप काम करावे लागणार आहे. दरम्यान, मलालास शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून सुमारे एक लाख लोकांनी स्वाक्षरी करून आग्रह केला होता.
खबरदार, मलालाचे पुस्तक विकाल तर - तालिबान
मलालाची आत्मकथा ‘आय अ‍ॅम मलाला’ या पुस्तकाची विक्री करताना कोणी आढळून आले, तर त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, अशी धमकी तेहरिक-ए-तालिबानने शुक्रवारी दिली. संधी मिळताच मलालावर पुन्हा हल्ला केला जाईल, असे तालिबानने आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. ‘डॉन’मधील वृत्तानुसार टीटीपीचे प्रवक्ते शहिदुल्ला शहीद म्हणाले, मलालाने कोणतेही शौर्य गाजवलेले नाही. उलट तिने इस्लाम धर्माला धर्मनिरपेक्षतेने बदलले आहे. त्यासाठीच तिला पुरस्काराने गौरवले जाऊ लागले आहे.