आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ice Bucket Challenge In World, Latest News In Divya Marathi

निधी जमवण्‍याचे बर्फाळ आव्‍हान बदलू शकतो, 'चॅरिटी'चा अंदाज, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेजगभरातबर्फाळ पाण्याने अंघोळ (एएलएस : आइस बकेट चॅलेंज) करण्याच्या आव्हानाने आजारांशी दोन हात करण्यासाठी निधी जमवण्याच्या मोहिमेला नवी दिशा दिली आहे. एका महिन्यापेक्षा कमी काळात बर्फाळ पाण्याने आंघोळ करणा-या लाखो लोकांनी आपले व्हिडिओ शेअर केले आहेत. ते इतरांना असे करण्याची प्रेरणा देत आहेत. निधीदेखील दान करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टे बिल गेट्स, फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहम यांच्यापासून ते आयटी, चित्रपट उद्योग, बिझनेस आणि इतर क्षेत्रांतील कित्येक लोकांनी आव्हानात भाग घेतला आहे.
चेतासंस्थेवर हल्ला करणारा जीवघेणा आजार अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस (एएलएस) वरील उपचाराच्या संशोधनासाठी २९ जुलै ते २० ऑगस्टदरम्यान तीन कोटी दहा लाख डॉलर जमले होते. ही रक्कम २०१२ मध्ये जमलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. अमेरिकेच्‍या एएसएस असोसिएशन ही मोहीम चालवते.

अमेरिकन नागरिक दरवर्षी ३०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम दुसऱ्यांच्या मदतीसाठी देतात. तेथे सुमारे दहा लाख धर्मादाय संस्था सक्रिय आहेत. त्यातील अनेक संघटना सक्षम नाहीत. एएलएस आइस बकेट चॅलेंजचे यश फारच लक्षणीय आहे. परोपकाराच्या कामात गुंतलेली प्रत्येक संस्था या यशाकडे लक्षपूर्वक पाहत असेल. फास्टर क्युअर संस्थेचे कार्यकारी संचालक मार्गारेट अँडरसन यांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही अशा प्रकारच्या समस्यांविषयी नेहमी विचार करतो. आपण केवळ याच वेळेला बर्फाच्या पाण्याने भरलेली बादली ओतून धनादेश लिहावा आणि सतत असे करू नये.’ फास्टर क्युअर थिंक टँक एएलएससारख्या आजारांवर उपचार शोधण्याठी काम करत आहे. धर्मादाय यशस्वी करण्यासाठी एखादा जादुई फॉर्म्युला नाही. तरीही आइस बकेट चॅलेंज एएलएससारख्या आवश्यक अभियानांसाठी उपयोगी ठरू शकतात. चॅलेंजने वेगाने निधी जमवण्यासंबंधी अनेक आश्चर्यकारक सत्य आणि ट्रेंड उघड केले आहेत. यांतील काहींचा आगामी वर्षांत अनुसरण होण्याची शक्यता आहे.

पूर्वीपासून सुरू - परोपकारासाठीनिधी जमवणारी एएलएस असोसिएशनने आइस बकेट चॅलेंज शोधले नाही. बोस्टनमध्ये एएलएसपीडित पीटर फ्रेट्सनी गेल्या वर्षी जुलै आपल्‍या मित्रांमध्ये असे अभियाम चालवले होते. असोसिएशनच्या लक्षात आले की, यातून दान देण्याचा वेग वाढला आहे. संघटनेने तात्काळ मोहिमेला पाठिंबा दिला. मोठ्या संख्येने सेलिब्रेटींसह हजारो लोक अभियानाला जोडले गेले.
मौजआणि सोपे नियम -आइसबकेट चॅलेंज साखळीसारखे काम करते. तुम्ही आव्हान पुढे सरकवता. स्पष्ट मानदंड निश्चित करतात. आव्हान स्वीकारा, व्हिडिओ अपलोड करा, इतरांना सांगा, दान देण्यासाठी चोवीस तासांची मर्यादा आदी हे मानदंड आहेत. त्यातून तत्काळ काही करण्याची भावना जागी होते. चॅरिटीशी संबंधित इतर अभियानांचे असे नाही.
व्हिज्युअल्सआणि क्रिएटिव्हिटी - बिकिनीघालू थंड पाणी ओतणारी इगी अजालिया आणि वेगळ्या पद्धतीने पुढे होणारे बिल गेट्स यांची दृश्ये लोकांना प्रभावित करतात. नामी हस्तींनी सुरुवात केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा मिळते. वेल व्हॅली फाउंडेशनचे सीईओ सील फोल्ज सांगतात, आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही भन्नाट आयडिया आहे. लोक व्यक्तिगत पातळीवर जोडले जातात.
दानघेणे सोपे होईल - चॅरिटीनेव्हिगेटरचे सीईओ केन बर्जर यांच्या मते बहुतांश दान धनादेशाद्वारे दिले जाते. भरपूर निधी बाळगणाऱ्या बुजुर्ग लोकांना आतासुद्धा धनादेश लिहिणे आवडते, परंतु डिजिटल माध्यमातून भरपूर रक्कम जमवणाऱ्या आइस बकेट चॅलेंजमुळे ऑनलाइन कलेक्शनची गती वाढेल. हे माध्यम वेगवान आणि सोपे आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या कोणत्‍या सेलिब्रिटी झाल्‍या सहभागी...