आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेला बसलेल्या बर्फाच्या महावादळाच्या तडाखेत13 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या ईशान्येकडील भागाला बर्फाच्या महावादळाचा तडाखा बसला आहे. वादळानंतर तापमानाच्या पा-याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नागरी जीवन पूर्णपणे ठप्प झाले, तर बोस्टन, न्यूयॉर्क भागात विविध घटनांत 13 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे हजारो विमान फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
न्यूयॉर्कसह बोस्टनमध्ये बर्फाचे मोठ मोठे ढिगारे तयार झाले आहेत. बर्फाखाली वाहने अडकून पडली आहेत. रस्त्यांवर बर्फच बर्फ झाल्याने वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे. शुक्रवारी रात्रीपासून बोच-या थंडीचा कडाका वाढल्याने तापमान शून्य अंशाहून खाली येण्याची शक्यता वर्तवली जाते. न्यूयॉर्क शहरात उणे 10 अंश तापमानाची नोंद झाली आहे. फिलाडेल्फियामध्येही अशीच स्थिती आहे. न्यूयॉर्कमध्ये 6 इंचांपर्यंतची हिमवृष्टी झाली. बोस्टनमध्ये दोन फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. वादळी वा-याचा वेग ताशी 53 किलोमीटर असा आहे. न्यूयॉर्कमध्ये वादळामुळे त्राहि माम स्थिती पाहायला मिळू लागली आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे.