आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ice Storm Leaves Half A Million Without Power This Christmas In US And Canada

अमेरिका, कॅनडात आलेल्या हिमवादळाने 5 लाख लोकांचा ख्रिसमस आंधारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्टा- मध्य आणि ईशान्य अमेरिकेत आणि पूर्व कॅनडात आलेल्या प्रलयकारी हिमवादळात 24 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. या हिमवादळामुळे ठिकठिकाणी वीज पूरवठा विस्कळित झाला आहे. वीज पूरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी सुमारे 5 लाख लोकांचा ख्रिसमस आंधारत राहण्याची शक्यता आहे.
हिमवादळामुळे वातावरण अतिशय प्रतिकूल झाले आहे. तापमानात मोठी घट झाली असून हाडे गोठवून टाकणारी थंडी पडली आहे. हिमवादळ काही काळ विश्रांती घेण्याची शक्यताही दिसून येत नाही. आज आणि येत्या काही दिवसांमध्ये आणखी हिमवर्षाव होण्याची शक्यता यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने व्यक्त केली आहे.
कार्बनडाय ऑक्साईड विषबाधेमुळे कॅनडात पाच नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. टोरांटोच्या उत्तरेकडील भागात घरात ऊब निर्माण व्हावी यासाठी गॅस जनरेटर सुरू करताना दोन नागरिकांचा मृत्यू झाला. नॉर्थ शोर येथेही कॉर्बन मोनाक्साईडमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरण खराब झाल्यामुळे महामार्गावर झालेल्या अपघातात पूर्व कॅनडामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत.
टोरांटो येथील तापमानात बरीच घट झाली असून तापमान उणे 15 डिग्री सेल्सियसवर गेले आहे. येथील सुमारे 90,000 घरांमधील वीज पूरवठा विस्कळित झाला आहे.